Mobile Blast : धक्कादायक! गेम खेळताना मोबाईलचा स्फोट होऊन ३० हुन अधिक लोक जखमी

Shocking! More than 30 people were injured when a mobile phone exploded while playing a game

मुंबई : मोबाईलचा स्फोट होऊन अनेकांना ईजा झाल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. आता देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. एका छोट्या ट्रक मध्ये ३० हुन अधिक लोक देवदर्शनासाठी निघाले होते. यावेळी त्यातील एका व्यक्तीच्या मोबाईलचा गेम खेळताना स्फोट झाला झाला व संपूर्ण ट्रकला आग लागली. ही धक्कादायक घटना राजस्थानच्या (Rajasthan) चुरू जिल्ह्यातील साहवा पोलीस स्टेशन परिसरात शनिवारी घडली आहे.

या आगीमध्ये लहान मुलांसह दहा ते पंधरा भाविक जखमी झाले आहेत. यामध्ये तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. माहितीनुसार, माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली जेव्हा दिल्लीचे ३५ भाविक एका मिनी ट्रकमधून चुरू जिल्ह्यातील दादरेवा येथील गोगाजीच्या जन्मस्थानी पोहोचले होते.

मिनी ट्रकमध्ये बसलेला अनिकेत हा 14 वर्षीय मुलगा मोबाईलवर गेम खेळत होता. मोबाईलला आग लागताच त्या मुलाच्या हातातून मोबाईल ट्रकमध्ये असलेल्या गादीवर पडला त्यामुळे सगळीकडे आग पसरली. या आगीमुळे ट्रकमधील सर्व सदस्य घाबरले. अनिकेतसोबत अजून दोनजण गंभीर भाजले आहेत. याआगीमध्ये जखमी झालेल्या सर्वांवर चुरु जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *