Site icon e लोकहित | Marathi News

धक्कादायक! ऊसतोड मजुरांना आणण्यासाठी गेलेल्या एका वाहतूकदाराचा खून; वाचा सविस्तर

Shocking! Murder of a transporter who went to fetch sugarcane labourers; Read in detail

उसाला योग्य दर मिळत नसल्यामुळे सध्या राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आह. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी राज्यात ऊस परिषदेचे आयोजन करत आहेत. ऊस तोडणी मुकादमांच्या आर्थिक फसवणुकीमुळं ऊस वाहतूकदार अडचणीत आले आहेत. असा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.

सावधान! इन्स्टाग्राम वापरताय तर जरा जपून; सोशल मीडियावर प्राध्यापकाची लाखोंची फसवणूक

मुकादमांच्या आर्थिक फसवणुकीमुळं ऊस वाहतूकदार अडचणीत आले आहेत. त्यामुळे गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळानं मजुरांची जबाबदारी घ्यावी अशी मागणी देखील राजू शेट्टी यांनी केली आहे.

Gautami Patil: गौतमीला बॅक डान्सरसाठी मिळायचे ‘इतके’ मानधन; वाचा सविस्तर

” ज्या कुटुंबामध्ये एक लाख टन ऊसाचं गाळप केलं जातं, त्या कुटुंबाचा कुटुंबप्रमुख जर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा प्रमुख असेल तर हे ऑडीट नीट होईल का?” असा प्रश्न देखील राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

गुजरातमध्ये उसाला ४७०० भाव, मग महाराष्ट्रात २९०० एफआरपी का?, रघुनाथदादा पाटलांचा सरकारला सवाल

यंदाच्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजारहून अधिक ऊस वाहतूकदारांना मुकादम आणि ऊसतोड मजुरांनी गंडा घातलाय. यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ऊसतोड मजुरांना आणण्यासाठी गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील एका वाहतूकदाराचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे तेथील आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

‘या’ जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरु; उमेदवारांनी ‘असा’ करा अर्ज

Spread the love
Exit mobile version