सध्या देशात हिंदू मुस्लिम यावरून प्रचंड वाद पेटत आहेत. दिल्लीतील अफ्ताब आणि श्रद्धाच प्रकरण लोकं विसरण्याच्या मार्गावर होती, तोच साहिल आणि साक्षीचे प्रकरण समोर आलं. दरम्यान उत्तर प्रदेशातील असंच एक प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील मोहन या मुस्लिम व्यक्तीने आपण हिंदू आहे असं खोटं सांगत हिंदू महिलेला फसवलं आणि तिला मुस्लिम धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती देखील केली अशी माहिती समोर आली आहे.
नवरा-बायकोमध्ये मोबाईलवरून कडाक्याचं भांडण; नवऱ्याने उचलले धक्कादायक पाऊल
या फसवलेल्या व्यक्तीचे खरे नाव मेहरबान हुसैन असं आहे. त्या व्यक्तीने आधार कार्डवर मोहन असे नाव देखील करून घेतले आहे. या व्यक्तीने हे पुरावे दाखवत एका हिंदू महिलेला फसवलं आहे. मोहन असं खोटं नाव सांगून या मुस्लिम व्यक्तीने हिंदू मुलीची फसवणूक केली आहे, आणि या मुलीला सक्तीने धर्मांतर करण्याची जबरदस्ती केल्यामुळे पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. मेहेरबान हुसैनला मुरादाबाद रेल्वे स्टेशनवरून पोलिसांनी पकडले आहे.
मुरादाबादमधल्या रामपूर जवळील भोट गावामध्ये एका मुस्लिम व्यक्तीने आपण हिंदू आहे असं भासून एका हिंदू महिलेला फसवल्याची भयानक घटना घडली आहे. त्या व्यक्तीने या हिंदू महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं परंतु त्या हिंदू महिलेला ज्यावेळेस समजलं की तो खोटं बोलत आहे आणि त्याचं खरं नाव मेहरबान आहे. त्यावेळेस तिने त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडले. परंतु मोहसीन तिला कलियर शरीफ या ठिकाणी घेऊन जात होता. तिच्यावर जबरदस्त धर्मांतर करण्यासाठी तो तिला घेऊन जात होता. तोच पोलिसांनी त्याला रेल्वे स्टेशनवर पकडलं.
फ्री मध्ये करा घरबसल्या आधार कार्ड अपडेट, १५ जून पर्यंत शेवटची संधी
मेहरबान हुसैनच्या विरोधात भोट पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ” मेहरबानला पकडून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे”. रामपूर पोलीस ठाण्याचे Additional SPDR संसार सिंह यांनी ही माहिती दिलेली आहे.
एका युजरला Sorry म्हणतं ChatGPT ठरली अपयशी, युजरने स्क्रीनशॉट केला व्हायरल!