
उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना आज व्यापार क्षेत्रात मोठा धक्का बसला आहे. भारतातील दिग्गज उद्योगपती म्हणून त्यांची ओळख आहे. मागील वर्षी त्यांनी शेअर बाजारात विक्रमी कमाई केली होती. मात्र अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाली असून ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी ११ व्या क्रमांकावर आले आहेत. याआधी ते चौथ्या क्रमांकावर होते.
मोठी बातमी! भारतीय सलामीवीर मुरली विजयनं जाहीर केली निवृत्ती
हिंडेनबर्ग रिसर्चला आता अदानी समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांमध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची नाही. याबाबतचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर 10 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. गौतम अदानी यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनायचं होत मात्र आता ते जगातील सर्वात श्रीमंत टॉप-10 च्या यादीतून देखील बाहेर पडले आहेत.
सुषमा अंधारे ‘स्टूलवाली बाई’! ‘या’ बड्या नेत्याने केली जोरदार टीका
दरम्यान, अदानी समूहाच्या कंपन्यांनी कर्ज घेतले आणि शेअर्स तारण ठेवले यामुळे अदानी समूहाची आर्थिक स्थिती बिघडली आहे. हा अहवाल करताना अदानी समूहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत व हजारो कागपत्रांची तपासणी देखील करण्यात आली आहे.
धक्कदायक! पाकिस्तानमध्ये नमाजादरम्यान मशिदीत बॉम्बस्फोट; अनेकजण गंभीर जखमी