नुकत्याच पार पडलेली नाशिक पदवीधर निवडणुकीने राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजवली होती. यामध्ये सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून प्रदेश काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.
टिळक कुटुंबाची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांचे फोन वर फोन; म्हणाले, “सांभाळून घ्या आणि …”
दरम्यान, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीच्या निकालादिवशीच बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त करतानाच राजीनामा दिल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी कुणाला देणार विचारताच अजित पवार भडकले; म्हणाले, “मला मूर्ख…”
दिल्लीतील काँग्रेस सूत्रांकडून बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. बाळासाहेब आपल्या राजीनाम्यावर ठाम असून काँग्रेसच्याच विचारांनी पुढे जाणार असल्याच त्यांनी स्पष्ट केलं आहे.
‘या’ स्पर्धांना क्रिकेटर्सची पसंती टिकणार नाही; आयपीएल सुद्धा होणार बंद?