
सध्या विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांच्यासाठी एक धक्कदायक बातमी समोर आलं आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची २४ ते २५ जानेवारी दरम्यान चौकशी होणार आहे. त्याचबरोबर सुवेझ हक आणि डॉ.शिवाजी पवार (Shivaji Pawar) यांची देखील चौकशी केली असल्याची माहिती समोर आली आहे.
मोठी बातमी! बच्चू कडूंना धडकवणार आरोपी पोलिसांना सापडत नसल्याने कार्यकर्ते आक्रमक
आता या प्रकरणी चौकशी आयोगाने यांना नोटीस देखील बजावली आहे. नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं, याबाबत पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं काय हे देखील जाणून घेतलं जाणार आहे. त्याचबरोबर या या प्रकरणातील आरोपी हर्षाली पोतदार हिची देखील चौकशी होणार आहे.
दरम्यान सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी विश्वास नांगरे पाटील, सुवेझ हक आणि डॉ.शिवाजी पवार या सर्वांची चौकशी होणार आहे. माहितीनुसार, हर्षाली पोतदारची२१ ते २२ जानेवारी, डॉ शिवाजी पवार यांची २१ ते २३ जानेवारी, विश्वास नांगरे पाटील २४ ते २५ जानेवारी आणि सुवेझ हक यांची २४ तर २५ जानेवारी यासारम्यान चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नरेंद्र मोदी यांनी केले मराठी भाषेत ट्विट; म्हणाले, “मी मुंबईत…”
ज्यावेळी कोरेगाव भीमा हिंसाचार परकरण झाले होते त्यावेळी विश्वास नांगरे पाटील हे कोल्हापूर परिपरिक्षेत्राचे महानिरीक्षक होते. त्यामुळे याप्रकरणी आता त्यांची चौकशी होणार आहे.