
Shocking News । तामिळनाडूतील इरोड येथील खासदार गणेशमूर्ती यांनी रविवारी विष प्राशन केले. ते त्यांच्या राहत्या घरी बेशुद्धावस्थेत आढळले. गणेशमूर्ती यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. खासदार गणेशमूर्ती यांनी पक्षाने तिकीट नाकारल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना उपचार करण्यासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र आज गुरुवारी सकाळी खासदार गणेशमूर्ती यांनी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे तामिळनाडू राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

खासदार गणेशमूर्ती यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की त्यांना तिकीट देण्यास नकार दिल्याने ते गंभीर मानसिक तणावाखाली होते आणि त्यामुळे त्यांनी विष प्राशन केले. खासदार गणेशमूर्ती डीएमके पक्षाचे नेते असून त्यांना निवडणुकीसाठी तिकीट न दिल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. आणि यामध्येच या नेत्याचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू इरोड लोकसभा मतदारारसंघात द्रमुक पक्षाने गणेशमूर्ती याना तिकीट देण्यात आले नव्हते. त्यामुळे ते नाराज होते. आणि त्यांनी विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला.
Navneet Rana । ब्रेकींग! भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच नवनीत राणा यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय