मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद ( Maharashtra – Karnataka) आता पुन्हा एकदा पेटून उठला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर आपला अधिकार सांगितल्याने हा वाद चांगलाच चिघळत चालला आहे. दरम्यान राज्यातील राजकीय वर्तुळात सुद्धा यावरून चांगलाच गोंधळ सुरू आहे. एकीकडे महाराष्ट्र आपले क्षेत्र राखून ठेवण्यासाठी नेटाने लढतोय तर दुसरीकडे आता महाराष्ट्रातील काही गावांनीच स्वतःहून महाराष्ट्राकडे पाठ फिरवण्याचा निर्णय घेतलाय.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा; पोलिसांनी गौतमीलाच गाडीत बसवलं अन्..
त्याच झालंय अस की, गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील काही गावे सीमावादात ( Border battle) अडकून पडली आहेत. यामुळे या गावांचा कसलाच विकास ( development) झालेला नाहीय. या गावातील लोकांना योग्य त्या सोयीसुविधा मिळत नाहीत. यामुळे कंटाळून या गावांनी स्वतः महाराष्ट्राला सोडण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामध्ये विविध सीमांवरील सुमारे 150 गावांचा समावेश आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवरील बुलढाणा जिल्ह्यातील भिंगारा, गोमाल 1, गोमाल 2, चाळीसटापरी या गावांनी महाराष्ट्र सोडून मध्यप्रदेशमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
धक्कादायक! मांज्याच्या नायलॉनमुळे दुचाकीस्वाराचा गळा चिरून जागीच मृत्यु
तसेच आणखी काही गावांनी देखील महाराष्ट्र सोडण्याचा इशारा दिला आहे. सोलापूर, सांगली, नांदेड या जिल्ह्यातील गावांचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय चंद्रपूर- महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील 14 गावे, सोलापूर-अक्कलकोट येथील 23 गावे व दक्षिण सोलापूरची 10 गावे यांनी महाराष्ट्राकडे पाठ फिरवली आहे. विविध अडचणींचा सामना करून कंटाळलेल्या या गावांनी सरकारच्या दुर्लक्ष करण्यामुळे हा निर्णय घेतला आहे.
Rohit Pawar: “…तर यापुढं शांत बसणार नाही”, सीमावादावर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया