धक्कादायक! पोटच्या मुलाने केली चक्क आईवडीलांचीच हत्या

Shocking! Pot's son killed his parents

उतारवयात आई- वडिलांना त्यांच्या मुलांचाच आधार असतो. मुले आपला म्हातारपणी चांगला सांभाळ करतील या आशेवर आईवडील असतात. मात्र कोल्हापूर येथे एका मुलाने आई-वडिलांची निर्घृणपणे हत्या केली आहे. (Son kills Parents) या धक्कादायक घटनेने आजरा तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान हत्या करणारा हा मुलगा असल्याचे सांगितले जात आहे.

कोयता गॅंगनंतर आता तलवार गॅंग घालतेय धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथे ही घटना घडली आहे. सचिन गोरुले असे आरोपीचे नाव आहे. त्याच झालं असं होतं की, गोरुले यांच्या घरात काही कारणांवरून वाद झाले. यामुळे रागाच्या भरात सचिन यांनी आपल्या वडिलांना बेदम मारले. या मारहाणीत त्यांचा मृत्यु झाला.

ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांचा एकाच गाडीतून प्रवास

यावेळी सचिन यांच्या आईने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, सचिन यांनी आईला देखील मारले. आई जखमी अवस्थेत तळमळत होती. वडिलांच्या मृत्यूनंतर सचिन यांनी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले. शेजाऱ्यांनी आरडा ओरडा केल्यानंतर त्यांच्या आईला रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आईचा देखील मृत्यु झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णा गोरूले व पारुबाई गोरुले अशी मृतांची नावे आहेत. सचिन गोरुले यांचे मानसिक संतुलन व्यवस्थित नसल्याची माहिती आजूबाजूच्या लोकांनी दिली आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सामान्यांना चटका तर शेतकऱ्यांना दिलासा! गोकूळ डेअरीच्या दुधात ‘इतक्या’ रुपयांची वाढ

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *