
दिल्ली: ईडीने देशातील वेगवेगळ्या राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) विरोधात दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली जवळपास १५ राज्यांमध्ये कारवाई करण्यात आलीये. दरम्यान, पीएफआयकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या पाटणा येथील एका रॅलीला लक्ष्य करण्याची योजना आखण्यात आली होती, असा धक्कादायक खुलासा ईडीने केला आहे.
Milk: आता दुधाच्या दरात होणार वाढ, ‘ही’ डेअरी घेणार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय
त्याचबरोबर भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट घडवून आणण्यासाठी पीएफआयतर्फे घातक शस्त्रे आणि स्फोटके गोळा केली जात होती. अस देखील ईडीने म्हंटले आहे. पाटणामध्ये 12 जुलै च्या रॅलीमध्ये हा घातपात करण्याचा कट रचण्यात आला होता. पिएफआयच्या खात्यामध्ये वर्षभरात जवळपास 120 कोटी जमा करण्यात आले होते. ही जमा केलेली रक्कम नरेंद्र मोदी यांचा घातपात करण्यासाठी जमा करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये.
डेंग्यू-मलेरिया पसरवणाऱ्या डासांपासून सावधान, या पाच नैसर्गिक वस्तूंमुळे होईल बचाव
दरम्यान, दहशतवादी कारवाया केल्याच्या आरोपावरून एनआयएआणि ईडीने देशभरातील १५ राज्यांमध्ये छापे टाकून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंधित सुमारे १०६ जणांना अटक केलीये. त्याचबरोबर महाराष्ट्रातही राष्ट्रीय तपास यंत्रणेसह संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत २० पेक्षा जास्त जणांवर कारवाई करण्यात अली आहे.
‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 72 तासांच्या आतच नुकसानीची पूर्वसूचना द्यावी लागणार