सध्या उन्हाळा ऋतू सुरु आहे. त्यामुळे सगळीकडे आंब्याच्या झाडाला आंबे (Mango) लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. बऱ्याच लोकांना आंबे खाण्याचा मोह आवरत नाही म्हणून ते आंब्याच्या झाडावर चढून आंबे काढत असतात. मात्र अशावेळी काही धक्कादायक घटना घडलेल्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. सध्या देखील आंबे काढण्यासाठी झाडावर चढलेल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
महिलेला बेशुद्ध करून बेडवर नेले नको ते केलं, अश्लील फोटोही काढले अन्..
आंबे काढण्यासाठी गेलेल्या सेवानिवृत्त पोलिसाचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे राजगुरुनगर परिसरात एकच खळबळ उडाली होती. मारुती सीताराम घुमटकर ( वय ६५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून मारुती घुमटकर यांच्या घराशेजारी आंब्याचे झाड आहे. यावेळी आंबे काढण्यासाठी ते आंब्याच्या झाडावर चढले. मात्र, आंब्याच्या झाडातून वीजेची तार गेल्याची गोष्ट त्यांना माहिती नव्हती. यावेळी आंबे काढताना त्यांचे दुर्लक्ष झाले आणि वीजेच्या तारेला स्पर्श होताच त्यांना जोरदार शॉक बसला.
Eknath Shinde। मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! पंढरपूर आषाढी यात्रेसाठी पाच हजार बसेस सोडणार
विजेचा शॉक बसल्यानांतर ते झाडावरून खाली पडले आणि त्यांच्या मृत्यू झाला. या घटनेमुळे राजगुरू नगर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. माहितीनुसार, घुमटकर हे काही दिवसांपूर्वीच पोलिस सेवेतून निवृत्त झाले होते. ते मनमिळावू स्वभावाचे होते त्यामुळे त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.
मोठी बातमी! गौतमी पाटीलने घेतली खासदार उदयनराजे यांची भेट; चर्चांना उधाण