
1 जुलै रोजी समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) एक भीषण अपघात झाला होता. या अपघातात एकूण 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे अजूनही परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने (State Govt) तातडीने मदत जाहीर देखील केली आहे. आता बुलढाण्यातील (Buldhana) घडलेल्या या भीषण अपघाताचा अंतिम फॉरेन्सिक अहवाल (Forensic report) समोर आला असून त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. (Latest Marathi News)
काही सेकंदातच घरे, मोठी दुकाने वाहून गेली, शिमल्यात मुसळधार पावसाचा कहर; व्हिडीओ पाहून बसेल धक्का
अहवालानुसार हा अपघात जेव्हा झाला तेव्हा ती बस समृद्धी महामार्गाच्या पहिल्या लेनमध्ये होती, जी खरंतर ओव्हरटेकिंग लेन आहे. बसचा स्पीड 70 ते 80 किलोमीटर प्रति तास इतका होता. या बसचे समोरचे चाक अगोदर साईन बोर्डला जाऊन धडकले. त्यानंतर ती बस 10 फूट अंतरावर असणाऱ्या एका दुभाजकाला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यामुळे बसचा मागील टायर फुटून टायरच्या आतील लोखंडी रिंग मोडकळीस आल्याने बस पलटी झाली.
भीषण अपघात! देवदर्शन करुन घरी येताना काळाने घातला घाला, २ जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी
या अपघातग्रस्त बसच्या समोरचा एक्सेल तुटून वेगळा झाल्याने तो डिझेल टँकवर आदळला. डिझेलच्या संपर्कात बस आल्याने तिने पेट घेतला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बस वाहतुकीच्या सर्व नियमाचे उल्लंघन करून प्रवास करत होती. त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
बारामतीत सुप्रिया सुळे-पार्थ पवार आमने सामने? पवार कुटुंबातील व्यक्तीने दिले ‘हे’ उत्तर