पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील राजगड (Rajgad) किल्ल्याच्या पायथ्याशी एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. रविवारी सकाळी हा मृतदेह सापडला होता. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली होती. दर्शना दत्तू पवार असे मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे. या तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता.
लग्नात फोटो काढताना नवरदेवाचा संयम सुटला, पाहुणेमंडळीही संतापली; पाहा व्हायरल व्हिडीओ
या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबधित तरुणीच्या डोक्यात त्याचबरोबर शरीरावर देखील गंभीर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर येतं आहे. त्यामुळे आता पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली आहे.
दरम्यान, ती नुकतीच एमपीएससीची परीक्षा पास झाली होती. तिची रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदावर नव्याने निवड झाली होती ती एमपीएससी परीक्षेत राज्यामध्ये सहावी आली होती.
भर लग्नमंडपातून पोलिसांनी नवरीला फरफटत नेले; कारण वाचून हादराल