सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांना प्रसिद्धी मिळत आहे. टिकटॉक सुद्धा एक चांगला व कलागुणांना वाव देणारा प्लॅटफॉर्म होता. आता टिकटॉक बंद झाले असले तरी यावरील संतोष मुंडे हा कलाकार आजही लोकांच्या मनात आहे. तुम्हाला वाचून धक्का बसेल पण, संतोष मुंडे ( santosh munde) हा टिकटॉक स्टार आता आपल्यात राहिला नसून त्याचा मृत्यु झाला आहे. संतोष यांचा काल ( दि.13) विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर संतोषसोबतच बाबुराव मुंडे याचाही मृत्यू झाला आहे. भोगलवाडी येथे सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
ब्रेकिंग! सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाला दिला मोठा धक्का!
संतोष मुंडे व त्यांचे मित्र बाबुराव मुंडे धारूर तालुक्यातील भोगलवाडी ते काळेचीवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या विजेच्या डीपीचा फ्यूज लावण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक वीज पडल्याने या दोघांनाही विजेचा धक्का बसला आणि दुर्दैवाने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेबाबत धारूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
बिग ब्रेकिंग! टिकटॉक स्टार संतोष मुंडेंचा विजेच्या धक्क्याने मृत्यु
जन्मताच आलेलं बोबडेपण व घरची प्रतिकुल परिस्थिती यावर मात करून संतोष मुंडे याने टिक टॉक वर (Tiktok star) आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याच्या भोळेपणा,भाबडेपणा आणि व्हिडिओ बनवण्याच्या युनिक शैलीने लोकांना जिंकले. एका सामान्य गावातील सामान्य मुलगा आपली वेगळी ओळख कशी निर्माण करू शकतो. याचे संतोष आदर्श उदाहरण आहे. लाखो लोकांना हसवणारा संतोष मुंडे काळाच्या पडद्याआड गेल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…