सध्या अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर भीषण रस्ता अपघात (Fatal road accident on Delhi-Meerut Expressway) झाला असून त्यात ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एका शाळेच्या बस आणि कारची धडक झाली आणि हा भीषण अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. (latest marathi news )
Petrol Diesel Price । पेट्रोल आणि डिझेलचे दर झाले कमी! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
दिल्ली-मेरठ महामार्गावरील अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. बस चालकाची चूक असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. वास्तविक या रस्त्यावर बस चालक चुकीच्या दिशेने येत होता. त्यामुळे हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. (Accident News)
राष्ट्रीय महामार्ग-9 वर चुकीच्या दिशेने स्कूल बस येत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. यादरम्यान बस भरधाव वेगाने येणाऱ्या कारच्या समोर येते. कारस्वाराला काही समजेपर्यंत हा अपघात झाल्याचे दिसत आहे.
बंडानंतर प्रथमच शरद पवार आणि अजित पवार दिसणार एकाच मंचावर, कधी आणि कुठे जाणून घ्या