Site icon e लोकहित | Marathi News

Crime News । धक्कदायक, चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने लिव्ह इन पार्टनरसोबत केलं असं काही की वाचून बसेल धक्का

Shocking, something that a lover did with a live-in partner because of character suspicion is shocking to read

Crime News । सध्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in relationship) राहणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेकजण लिव्ह इन रिलेशनशिपला पाठिंबा देतात. परंतु अनेकांचा याला विरोध आहे. अलीकडच्या काळात गुन्ह्यांमध्ये (Crime) वाढ झाली आहे. तसे पाहिले तर लिव्ह इनमध्ये राहणाऱ्यांची जास्त भांडण होतात. अनेकदा हे वाद विकोपाला जातात. सध्या असेच काहीसे प्रकरण समोर आले आहे. (Latest Marathi News)

Farmer News । मिरचीचं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा केविलवाणा प्रयत्न, चक्क बाटलीने पाजले पाणी

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका प्रियकराने आपल्या पार्टनरची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केरळमधील तिरुअनंतपुरम येथील देवा (वय -२४वर्षे) ही गेल्या दोन वर्षांपासून वैष्णवसोबत एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. आरोपी वैष्णव हा केरळमधील कोल्लमचा रहिवासी आहे. त्यांनी एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. ते सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्रात काम करत होते.

Agri News । संत्री उत्पादक शेतकरी फळगळतीमुळे संकटात, सरकारकडून मदतीची अपेक्षा

याबाबत मयत मुलीच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की त्यांच्यात बऱ्याच वेळा भांडण व्हायचे. परंतु दोघांपैकी कोणीही एकमेकांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली नाही. वैष्णवला त्याच्या मैत्रिणीबद्दल शंका होती की तिचे इतरत्र अफेअर सुरु आहे. त्यामुळे दोघांमध्ये भांडण व्हायचे. रविवारी दोघे पुन्हा एकमेकांशी भांडू लागले आणि रागाच्या भरात वैष्णवने त्या मुलीला प्रेशर कुकरने बेदम मारहाण केली. परंतु रक्तस्राव जास्त झाल्यामुळे मुलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Santosh Bangar । सर्वात मोठी बातमी! संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल, ‘ती’ चूक पडली महागात

दक्षिण बेंगळुरूचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सीके बाबा यांनी सांगितले की, आरोपीने मुलीला प्रेशर कुकरने बेदम मारहाण केली. या घटनेनंतर वैष्णव फरार झाला होता. परंतु पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

Babanrao Pacchpute । शेतकऱ्यांसाठी आमदार बबनराव पाचपुते करणार उपोषण

Spread the love
Exit mobile version