Neeraj Chopra : धक्कादायक! स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर

मुंबई : राष्ट्रकुल स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारतासाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारताचा स्टार भालाफेकमध्ये सुवर्णपदक मिळवणारा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. नुकतीच त्याला जागतिक ॲथिलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दुखापत झाली होती. आयओए सरचिटणीस राजीव मेहता यांनी नीरज चोप्राच्या राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडण्याची पुष्टी केली आहे.

राजीव मेहता (Rajeev Mehta) यांनी एक वृत्तसंस्थेला सांगितले की, “नीरज चोप्रा २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भाग घेणार नाही. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दुखापतीमुळे तो तंदुरुस्त नाही. त्यानी आम्हाला याबद्दल माहिती दिली आहे.”

जागतिक ॲथिलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये शेवटच्या सामन्यात नीरजला दुखापत झाली होती. यावेळी कार्यक्रमादरम्यान तो मांडीवर पट्टी बांधलेला दिसला होता. त्याच्या शरीराचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. यावेळी त्याच्या कंबरेच्या देखील जखमा दिसून आल्या त्यामुळे त्याला तीन आठवडे विश्रांती करण्याचा सल्ला देण्यात आला. अशा स्थितीत नीरजच्या अनुपस्थितीमध्ये यावेळी भारतासाठी सुवर्णपदक जिंकणे सोपे जाणार नाही.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *