Site icon e लोकहित | Marathi News

Supriya Sule । “शरद पवार यांना संपवण्यासाठी…” सुप्रिया सुळे यांचे धक्कादायक वक्तव्य

Supriya Sule

Supriya Sule । पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती मतदारसंघात (Baramati Constituency) यंदा नणंद विरुद्ध भावजय (Supriya Sule vs Sunetra Pawar) अशी लढत पाहायला मिळणार आहे. अटीतटीच्या सामन्यात बारामतीकर कोणाला निवडून देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जरी ही लढत नणंद विरुद्ध भावजय अशी असली तरी खरी लढाई शरद पवार विरुद्ध अजित पवार (Sharad Pawar Vs Ajit Pawar) अशीच आहे. (Latest marathi news)

Maharashtra politics । अजित पवार गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर, मंत्र्यांसमोरच कार्यकर्ते भिडले

खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. नुकतीच त्यांनी मुळशी तालुक्यात सभा घेतली. यावेळी सुप्रिया सुळेंनी भाजपवर (BJP) निशाणा साधला. “भाजपचं उद्धिष्ट विकासाचं नाही तर शरद पवारांना (Sharad Pawar) संपवण्यासाठी सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली आहे. भाजप हे षडयंत्र माझ्या वहिनीच्या रूपाने साधू इच्छित आहे,” असे मत सुप्रिया सुळे यांनी मांडलं.

Car Accident News । भीषण अपघात, भरधाव वेगात स्कॉर्पिओ खांबाला धडकली, 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

“भाजपने पवार कुटुंब फोडून बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत लावली आहे. माझ्याप्रमाणेच सुनेत्रा वहिनींना देखील पवार साहेब लेक मानतात. त्यामुळं आई समान वहिणींचा सन्मान निवडणुकीत राखला जाईल. पण भाजप मराठी माणसांमध्ये भांडणं लावून स्वतःची पोळी भाजून घेत आहे,” असा गंभीर आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे.

Navneet Rana । नवनीत राणांच्या अडचणी वाढल्या! महायुतीतल्या ‘या’ तिसऱ्या बड्या नेत्याने थोपटले दंड

Spread the love
Exit mobile version