
पुणे (Pune) शहरामध्ये गुन्हे काही थांबायचं नाव घेत नाहीत. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होतच चालली आहे. मागच्या काही दिवसांपासून कोयता गँगने पुण्यामध्ये दहशद माजवली आहे. ही गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाही. यामध्येच आता एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. पुण्यामध्ये एका नामांकित शाळेने विद्यार्थ्याने शाळेची फी भरली नाही म्हणून त्याला वर्गामध्येच कोंडून ठेवले.
ब्रेकिंग! अभिनेत्री राखी सावंतचा गर्भपात? चर्चाना उधाण
पुण्यातील वाघोली (Wagholi) परिसरामध्ये असणाऱ्या एका नामांकित शाळेतील ३०-४० विद्यार्थ्यांना फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना वर्गात कोंडून ठेवल्याचा आरोप पालकांनी केलाय.
बिग ब्रेकिंग! बृजभूषण सिंह यांच्यावर ‘सेक्स स्कॅण्डल’चे गंभीर आरोप
विद्यार्थ्यांची शाळा सुटण्याची वेळ १ वाजण्याची आहे मात्र शाळा सुटल्यानंतरही काही मुलांना वर्गात ४ वाजेपर्यंत डांबून ठेवले होते असा आरोप पालकांनी केला आहे. त्याचबरोबर फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी न पाठवता जोपर्यंत पालक येथे पैसे घेऊन शाळेत येत नाही तोपर्यंत मुलांना घरी सोडणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोप देखील पालकांनी केला आहे.
लाख रुपये पगार असणारी नोकरी सोडून मुलीने सुरु केली चहाची टपरी!