Site icon e लोकहित | Marathi News

Fire News । धक्कादायक! रेल्वेला भयानक आग, ८ प्रवासी ठार तर २० जखमी

Shocking! Terrible train fire, 8 passengers killed and 20 injured

Fire News । आजही मोठ्या प्रमाणात गॅस सिंलेंडरची तस्करी (Gas cylinder smuggling) केली जाते. या दरम्यान अनेक दुर्घटना घडल्याच्या घटनाही घडतात. अशीच एक दुर्घटना घडली असून यामध्ये चक्क रेल्वेलाच भयानक आग (Railway Fire) लागली आहे. अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. परंतु या दुर्घटनेमध्ये ८ प्रवासी ठार आणि २० प्रवासी जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

Electric Tractor । सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक ट्रॅक्टर! 2 तास चार्ज केल्यानंतर 8 तास काम करणार

मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील मदुराई रेल्वे स्थानकावर आज पहाटे ५:१५ वाजता लखनऊ-रामेश्वरम एक्स्प्रेसमध्ये ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बचावकार्य करत अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत इतर डब्यांचे कोणतेही नुकसान झाले नाही.

Chandrayaan 3 । “तुमच्या कार्याला आणि धैर्याला सलाम”; नरेंद्र मोदींनी केली सर्वात मोठी घोषणा

आग लागलेल्या डब्यात एकूण ५५ प्रवासी होते, त्यापैकी ८ प्रवासी ठार झाले असून सर्वजण उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तर २० प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, आता प्रवाशांकडून या डब्यामधून गॅस सिलिंडरची तस्करी केल्याने आग लागल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Havaman Andaj । मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात पाऊस, हवामान खात्याने कुठे दिला अलर्ट? जाणून घ्या एका क्लिकवर

Spread the love
Exit mobile version