Site icon e लोकहित | Marathi News

Crime News । धक्कादायक! जमलेलं लग्न मोडलं, मग तरुणानं घेतला टोकाचा निर्णय

Shocking! The arranged marriage broke up, then the young man took an extreme decision

Crime News । अहमदनगर : प्रत्येकाला मनासारखा जोडीदार (Life Partner) निवडण्याचा अधिकार आहे. हल्ली लग्नापूर्वी आणि लग्नानंतर फोटोशूट करण्याचा ट्रेंड आला आहे. लग्न (Marriage) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक प्रकारचा सणच असतो. परंतु जमलेले लग्न मोडल्याने एका ३२ वर्षीय तरुणाने टोकाचा निर्णय घेतला आहे. यामागचं कारण जाणून घेतले तर तुम्हालाही धक्का बसू शकतो. (Latest Marathi News)

Farmer Loan । सरकारकडून 1 एकर जमिनीवर किती कर्ज मिळते? जाणून घ्या मर्यादेसह सविस्तर माहिती

ही धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडली आहे. नितीन सीताराम खुळे असे या तरुणाचे नाव आहे. त्याने ठरलेले लग्न मोडल्याने वडगावपान शिवारात झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपुर्वी त्याने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. त्यात त्याने आपली व्यथा मांडली आहे. (Latest Crime News)

Sajay Raut । संजय राऊत यांची नार्को टेस्ट करा; भाजपच्या ‘या’ नेत्याची आक्रमक मागणी

गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या दहशतीमुळे आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. नातेवाईकांच्या तक्रारीवरून संगमनेर‌ पोलिसांनी प्रदीप भाऊसाहेब शिंदे, पोपट उर्फ बाजीराव सावळेराम कोल्हे, संदीप उर्फ संतोष शिवाजी दिघे, नानासाहेब कोल्हे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Share Market । जबरदस्त कमाई करायचीय? तर लगेचच करा ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणूक, पहा यादी

Spread the love
Exit mobile version