धक्कादायक! मुलं काढत होती आई-वडिलांचा फोटो, अचानक लाट आली अन्…

Shocking! The children were taking pictures of their parents, suddenly there was a wave and…

मुंबईमध्ये (Mumbai) मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्ते जलमय झाले आहेत. याचा वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. तर अनेकजण आपल्या कुटुंबासोबत समुद्रकिनारी फिरायला जात आहेत. परंतु समुद्रकिनारी फिरायला जाणे एका कुटुंबाच्या चांगलेच अंगलट आले आहे. मुंबई येथील वांद्रे बँडस्टँडजवळील (Bandra Bandstand) एक महिला पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Latest Marathi News)

बिग ब्रेकिंग! दोन गटात हाणामारी, हल्ल्यात राष्ट्रवादीचा पदाधिकारी गंभीर जखमी

रबाळेच्या गौतम नगरमध्ये हे कुटुंब राहत होते. ज्योती सोनार असे या महिलेचे नाव आहे. याबाबत तिचा पती मुकेश सोनार यांनी माहिती दिली आहे. “आमच कुटुंब दोन आठवड्यातून एकदा सहलीला जात होते. त्या रविवारी आम्ही जुहू चौपाटीवर (Juhu Chowpatty) गेलो होतो. परंतु त्या दिवशी भरती-ओहोटीमुळे आम्हाला समुद्रकिनाऱ्यावर जाता आले नाही. त्यामुळे आम्ही वांद्रे येथे जाण्याचे ठरवले.

पशुपालकांसाठी आनंदाची बातमी.. पशुधन खरेदीसाठी मिळेल अवघे ४ टक्के व्याजाने कर्ज, या सोप्या पद्धतीने करा अर्ज

त्या ठिकाणी आम्ही वांद्रे किल्ल्याजवळ पोहोचल्यानंतर फोटो काढत होतो. फोटो काढण्यासाठी ज्योती माझ्या पाठोपाठ समुद्रात आली आणि आम्ही पाण्यात खेळत होतो. काही वेळाने आमची मुले आमच्याकडे येत होती. परंतु आम्ही त्यांना येऊ दिले नाही. त्यांना दुरूनच फोटो काढायला सांगितले. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली.

महेश कोठारे यांच्यावर कोसळला मोठा दुःखाचा डोंगर; वडिलांनंतर आईचेही झाले निधन

ज्यावेळी लाट आम्हाला मागून धडकली त्यावेळी माझा तोल जाऊन आम्ही दोघेही पाण्यात घसरलो. मी ज्योतीची साडी पकडली आणि जवळच्या एका पर्यटकाने माझा पाय मागून पकडला, मी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु मला तिला वाचवता आले नाही, असे मुकेश यांनी सांगितले.

Havaman Andaj : राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस; ‘या’ भागांमध्ये यलो अलर्ट

Spread the love