धक्कादायक! चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू तर 12 जण गंभीर

अपघाताच्या (Accident) घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत सतत अपघात होत आहेत. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने, वाहनाचे टायर फुटल्याने त्याचबरोबर जंगली जनावर आडवे आल्याने अपघात होत असतात. सध्या देखील एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. लग्नासाठी निघालेल्या एका बसचा अपघात (Bus Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

Onion Price Hike । शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी! कांद्याच्या दरात झाली विक्रमी वाढ

या अपघातात सात लोकांचा जागीचं मृत्यू तर 12 जण गंभीर जखमी झाले आहे. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. या बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कॅनॉलमध्ये पलटी झाली. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले आहे.

PM Kisan Yojana । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 2000 रुपये

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्रप्रदेश (Andhra Pradesh) राज्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील पोडिली काकीनाडा या ठिकाणी लग्नात जाण्यासाठी लोकांनी प्रवासासाठी सरकारी मालकीची असणारी आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (Andhra Pradesh State Road Transport) बस भाड्याने घेण्यात आली होती. परंतु गाडी सुरु असताना चालकाला डुलकी लागली आणि बस रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कॅनॉलमध्ये पलटी झाली.

Sharad Pawar । शरद पवारांना पुन्हा मोठा धक्का! फसवून सही घेतली असे बोलणारा आमदार पुन्हा अजित पवारांकडे

Spread the love