Site icon e लोकहित | Marathi News

धक्कदायक! पळून गेलेल्या पोटच्या मुलीला बापानेच लटकवलं फासावर

Shocking! The father himself hanged the runaway girl from the gallows

आजही ‘लग्न’ म्हंटल की मुलीची संमती लोक विचारात घेत नाहीत. आपली मते व स्वार्थ साधून बऱ्याचदा मुलींच्या लग्नाचा व्यवहार केला जातो. जालना येथे नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पीर तालुक्यातील पिंपळगाव ( Pimpalgaon) येथे मुलीचे लग्न तुटल्याने बदनामीच्या रागातून काका व वडिलांनी स्वतःच्याच मुलीची हत्या केली आहे. लग्नाची एका मंदिरात तयारी करण्यात आली होती. परंतु, लग्नापूर्वीच अर्धा एकर जमीन मुलीच्या नावे करण्यावरून बिनसले व लग्न तुटले.

घाटेअळीला वेळीच टाळा, अन्यथा हरभऱ्याचे होऊ शकते नुकसान; ‘असे’ करा उपाय

सुर्यकला सरोदे असे या मुलीचे नाव असून लग्न तुटताच सूर्यकलाला तिच्या वडिलांनी व काकांनी मंडपातून ओढत आणले. यानंतर लिंबाच्या झाडाला दोर लावून तिला लटकवले व तिची हत्या (Murder) केली. ते इतक्यातच थांबले नाहीत तर दोघा भावाभवांनी मिळून पोटच्या मुलीचे सरण रचले व तिला जाळून टाकले. मृतदेह जळल्यानंतर उरलेली राख या दोघांनी दोन पोत्यात भरून ठेवली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) हादरून गेला आहे.

पशुपालनाला महागाईचा झटका; उत्पादकांची चिंता वाढली …

त्याच झालं असं होतं की, सुर्यकलाचे तिच्या चुलत आत्याच्या मुलावर प्रेम होते. हे दोघेही घरातून निघून गेले होते. परंतु, घरच्यांनी त्यांना लग्न करून देतो, असे सांगून यांना घरी माघारी बोलावले. यानंतर एका मंदिरात त्यांनी दोन्ही कुटुंबे लग्नासाठी एकत्र जमली. यावेळी मुलीच्या काकाने अर्धा एकर शेती मुलीच्या नावावर करण्याची मागणी केली. याला नकार मिळाल्याने लग्न तुटले व ही धक्कादायक घटना घडली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुर्यकलाचे वय फक्त 17 वर्षे आहे. दरम्यान आरोपी म्हणून सुर्यकलाचे वडील संतोष सरोदे व काका नामदेव सरोदे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पशुपालनाला महागाईचा झटका; उत्पादकांची चिंता वाढली …

Spread the love
Exit mobile version