लवकरच लोकसभा (Loksabha) आणि विधानसभेच्या निवडणुका (Legislative Assembly Elections) पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्व पक्ष प्रचारासाठी मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. सध्या राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार आहे. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) फुटीमुळे जनता कोणत्या पक्षाला निवडून देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु त्यापूर्वी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) ज्या बोटांनी मतदान केले तीच बोटे छाटली आहेत. (Latest Marathi News)
Accident News । हृदयद्रावक! अपघातानंतर बसला आग, होरपळून १६ प्रवाशांचा मृत्यू तर ११ जण गंभीर जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नंदकुमार ननावरे यांनी आपल्या पत्नीसह आत्महत्या केली होती. या आत्महत्येला अंबरनाथेचे आमदार बालाणी किणीकर यांचे पीए जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या घटनेनंतर खूप मोठी खळबळ उडाली होती. आता न्यायासाठी नंदकुमार ननावरे यांचे बंधू धनंजय ननावरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
त्यांनी आपल्या हाताचे एक बोट कापून राज्य सरकारला पाठवले आहे. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मी माझ्या शरीराचा एक एक अवयव कापून सरकारला पाठवत राहणार असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ज्या बोटांनी नरेंद्र मोदींना मतदान केले तीच बोटे छाटली, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ तयार केला आहे. दरम्यान, त्यांच्या या भूमिकेवरून अनेकांना धक्का बसला आहे.
Mushroom Farming । लाखोंची कमाई करायची असेल तर करा मशरूमची लागवड, सरकारकडूनही मिळेल आर्थिक मदत