मुंबई : अलीकडे आपल्याकडे हल्ला केल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. आता पनवेलमधून (Panvel) एक धक्कादायक बातमी आली आहे. आपल्या पत्नीशी फोनवर अर्वाच्च भाषेत बोलणाऱ्या व्यक्तीवर पतीने चाकू हल्ला केल्याची घटना घडलीये. स्वप्नील स्वामी असे आरोपी पतीचे आहे. कमलाकर भगत असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
दिव्यांगांना बसमध्ये मिळणार मोफत प्रवास, ‘ही’ कागदपत्र आवश्यक
दरम्यान तिथल्या पोलिसांनी (police) आरोपी पतीवर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल येथील झवेरी बाजार परिसरात बुधवारी (wednesday) संध्याकाळी कमलाकर याने आरोपीच्या बायकोची छेड काढली होती. त्याचबरोबर फोन करून देखील काहीही अपशब्द बोलायचा त्यामुळे पतीने चिडून कमलाकरवर चाकूने हल्ला केला.
Marigold: झेंडूने खुलविले शेतकऱ्याचे जीवन, रोज मिळतोय ‘एवढा’ पैसा
पण यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे ही घटना घडल्यानांतर स्वप्नीलने स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा कबुल केला. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्वप्नीलआर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर जखमी कमलाकर याच्यावर उपचार सुरु आहे.
Engineering: राज्य सरकारचा मोठा निर्णय! इंजिनीयरींगचे शिक्षणही आता मिळणार मराठीतून