
आपल्या भारत देशात देवी देवतांची (god) पूजा करावी लागते. इतकंच नाही तर आपल्या देशात निसर्गासह प्राणी आणि पक्ष्यांची पूजा (worshiped) करण्याचा देखील नियम आहे. दरम्यान भारतीय लोकांचा देवी देवतांवर विश्वास हा मोठ्या प्रमाणात असतो. दरम्यान अशीच एक मंदिराची घटना आहे. पण ती ऐकून तुम्हाला आश्चर्यच वाटेल. भारतात अस एक अनोखे मंदिर आहे जिथे मांजरीची (cat) पूजा केली जाते. हे अनोखे मंदिर कर्नाटकमध्ये आहे. तर दुसरीकडे हिंदू धर्मात आपण पाहिलं तर जेव्हा आपण कुठेतरी जात असतो. त्याचवेळी जर मांजर आडवी गेली तर ते आपण ते अशुभ मानतो. इतकंच नाही तर मांजर आडवी गेल्यावर अनेकांच्या कपाळावर सुरकुत्या पडतात. जेव्हा मांजर रस्ता ओलांडते तेव्हा लोक देखील थोडा वेळ थांबतात. मगच पुढचा प्रवास सुरू करतात.
Marigold: झेंडूने खुलविले शेतकऱ्याचे जीवन, रोज मिळतोय ‘एवढा’ पैसा
गेल्या 1000 वर्षांपासून कर्नाटकातील (Karnataka) या मंदिरात मांजरीची पूजा केली जाते. खरतर हे अनोखे मांजरीचे मंदिर कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यापासून 30 किमी अंतरावर असलेल्या बेक्कलेले गावात आहे. विशेष म्हणजे या गावाचे नाव बेक्कू या कन्नड शब्दावरून पडले आहे. दरम्यान बेक्कू याचा मराठी अर्थ मांजर आहे. बेक्कू या गावातील लोक मांजराला मंगम्मा देवीचा अवतार मानतात.
दिव्यांगांना बसमध्ये मिळणार मोफत प्रवास, ‘ही’ कागदपत्र आवश्यक
तसेच मांजरीची विधीपूर्वक पूजा आर्चा करतात. या गावात दरवर्षी मंगम्मा देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. असं म्हटल जात की, देवी मंगम्मा ही मांजरीच्या रूपात गावात दाखल झाली होती. तिने गावकऱ्यांचे वाईट शक्तींपासून संरक्षण केले. आणि त्या ठिकाणी नंतर एक निशाण सोडून गेली. दरम्यान तेव्हापासून बेक्कू या गावातील लोक मांजराची पूजा करतात.
Engineering: राज्य सरकारचा मोठा निर्णय! इंजिनीयरींगचे शिक्षणही आता मिळणार मराठीतून
मांजरीच्या पूजेची ही गोष्ट आपल्यापैकी बऱ्याच जणांना थोडी विचित्र वाटेल. पण तेथील स्थानिक लोकांचा मांजरीवर विश्वास आहे आणि मांजरांप्रती सकारात्मक दृष्टीकोन आहे. बेक्कू या गावात जर कोणी मांजरीला इजा केली तर त्याला गावाबाहेर हाकलून दिले जाते, असे म्हणतात. तसेच, मांजराच्या मृत्यूनंतर, संपूर्ण विधी करून त्याचे दफन केले जाते.
कैद्यांसाठी आनंदाची बातमी! आता कारागारगृहातही ठेवता येणार शारीरिक संबंध