लग्नाचे (Marriage) सुरुवातीचे काही दिवस नवविवाहित जोडप्यासाठी मंतरलेले असतात. या दिवसात पती-पत्नीच्या नात्यात विश्वासाचे बंध तयार होत असतात. मात्र बीडमध्ये (Beed) लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच नवविवाहित वराला त्याच्या पत्नीने धोका दिला आहे. याठिकाणी नववधू घरातून सोने व रोख रोकड घेऊन लंपास झाली आहे. याप्रकरणी बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (Newly marride bride cheated with groom)
ब्रेकिंग! ‘या’ महिन्यामध्ये होणार लोकसभा निवडणुका; कोणी दिले संकेत?
नितीन उबाळे या तरुणाचा भारत मेट्रिमनी विवाह संस्थेच्या माध्यमातून विवाह झाला होता. याठिकाणी अडीच हजार रूपये शुल्क भरून त्याने नावनोंदणी केल्यानंतर त्याला आशा नामक मुलीचे स्थळ आले होते. आळंदीमध्ये या दोघांचा विवाह झाला. त्यानंतर दोघेही बीडमध्ये भाड्याच्या घरात राहू लागले. दरम्यान लग्नाला १३ दिवस पूर्ण होताच आशा घरात कोणालाच कल्पना न देता निघून गेली.
धमक होती तर नवीन पक्ष काढायचा होता ना? अजित पवार यांची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
घरातून बाहेर पडताना आशाने सत्तर हजारांची रोकड व चार तोळे सोने सोबत न्हेले. एवढंच नाही तर लग्नाआधी आशाच्या वडिलांनी नितीन कडून दोन लाख घेतले होते. यामुळे नितीनची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी नितीनने आशा, तिचे आई-वडील व भाऊ यांच्या विरोधात पोलिसांत फिर्याद दिली आहे.
काहीतरी शिजतंय? मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेऊन नाना पाटेकर यांनी केली ‘या’ विषयावर चर्चा