नवविवाहित जोडप्याचे सुरवातीचे काही दिवस मंतरलेले असतात, असे म्हणतात. ( Newly married Couple) नात्यात असलेलं नवे पण आणि एकमेकांसाठी असणारं कुतूहल यातून या दिवसांत दोघांमध्ये प्रेम बहरत असते. मात्र झारखंड (Zarkhand) येथील एका नवविवाहित जोडप्याच्या बाबतीत एक धक्कादायक प्रकार घडलाय. लग्नाला काहीच महिने पूर्ण होत नाहीत तोपर्यंत या जोडप्याचे मृतदेह (Death Bodies) त्यांच्या खोलीत सापडले आहेत. आश्चर्यकारक बाब म्हणजे महिलेचा मृतदेह बेड वर आढळला आहे तर पतीने गळफास लावून घेतलेला आहे.
काल रात्रीच्या वेळी जेवण करून हे जोडपे नेहमीप्रमाणे आपल्या खोलीत झोपायला गेले होते. परंतु, सकाळी उशीर होऊन देखील दोघेसुद्धा खोलीबाहेर पडले नाहीत. खुप वेळ वाट बघून कुटूंबातील सदस्यांनी खोलीमध्ये डोकावून पाहिले. यावेळी त्यांना हे जोडपे मृतावस्थेत दिसले. हे पाहून घाबरलेल्या घरातील सदस्यांनी शेजाऱ्यांना याची माहिती दिली. दरम्यान घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टम साठी पाठवले.
अतिक अहमदच्या पत्नीबाबत समोर आली धक्कादायक माहिती; पोलीस म्हणाले…
राजकुमार यादव व पूजा देवी यांचा विवाह २२ फेब्रुवारी २०२३ ला झाला होता. राजकुमार हा मुंबई येथे कामाला होता. काही दिवसांपूर्वी तो सुट्टीसाठी घरी आला होता. परंतु, तीन दिवसांच्या आधी पूजाचा मेव्हणा घरी पाहुणा म्हणून आलेला. तो आल्यानंतर दोघे पती-पत्नी मध्ये वाद झाले होते. अशी माहिती देण्यात आली आहे.