लग्न ( marriage) हा एखाद्याच्या आयुष्यातील फार महत्त्वाचा प्रसंग असतो. यावेळी भावी आयुष्यासाठी प्रचंड स्वप्ने रंगवली जातात. मात्र लग्नादिवशीच जोडीदाराने साथ सोडली असेल तर? होय! बिहारमध्ये अशी धक्कादायक घटना घडली आहे. लग्नसोहळा पार पडल्यानंतर काही काळातच याठिकाणी वराचा मृत्यु ( Death of groom) झाला आहे. अगदी काही तासांतच नवविवाहित वधू विधवा झाल्याचे चित्र लोकांनी यावेळी पाहिले.
बिहार ( Bihar) येथे नुकताच विनीत प्रकाश व आयुषी यांचा विवाह पार पडला. हे दोघेसुद्धा उच्चशिक्षित व मोठ्या पगाराच्या नोकरीवर होते. या दोघांचे लग्न झाल्यानंतर काही वेळातच खुर्चीवर बसलेला विनीत अचानक खाली पडला. यावेळी त्याला ताबडतोब रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र विनीतला तपासताच डॉक्टरांनी त्याला मृत म्हणून घोषित केले.
“लावणी कशी असते याचा मी अभ्यास केलेला नाही, तर मी डीजे शो…” गौतमी पाटीलचे मोठे वक्तव्य
ही माहिती मिळताच वधूने ( Bride) नवरीच्या वेशातच रुग्णालयात धाव घेतली. याठिकाणी तिने अगदी मोठ्याने रडून गोंधळ केला. तुला माझी साथ घ्यायचीच न्हवती तर आयुष्यात का आलास? असे आयुषी सतत म्हणत होती. विनीतचा मृत्यु हृदयविकारने झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Accident । कार आणि बाईकचा विचित्र अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू