राजस्थानच्या ( Rajsthan) अजमेर जिल्ह्यात एका तरुणाने विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणाने महिलेचा व्हिडीओ देखील बनवला आहे. दरम्यान हा तरुण पीडित महिला व तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत असल्याची माहिती समोर आली आहे.
अशी झाली लक्ष्या आणि महेशची दोस्ती! कोठारेंच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आठवणींना उजाळा
या पार्श्वभूमीवर पीडित महिलेच्या पतीने पोलिसांत तक्रार दिली आहे. 4 जानेवारीला सकाळी साडे दहाच्या सुमारास महिला घरात एकटीच होती. यावेळी एक तरुण मोटारसायकल वरून महिलेच्या घरी आला. दरम्यान या तरुणाने कॅमेरा ( camera) ऑन करून महिलेवर बलात्कार (Rape) केला.
यानंतर काही वेळाने विवाहितेचा दिर तेथे आला. तेव्हा आरोपीने मोबाईल व मोटारसायकल तिथेच टाकून पळ काढला. पोलिसांत तक्रार दिल्यास तुला आणि तुझ्या मुलांना मारून टाकीन अशी धमकी देखील त्याने यावेळी विवाहितेला दिली.
कांद्यावर रोग आलाय? टाक्या किडीने पिकाचे नुकसान होत आहे… तर चिंता करू नका; ‘हे’ उपाय करून पहा
यानंतर 17 जानेवारीला आरोपीचा भाऊ विवाहितेच्या पतीला शेतात भेटला. यावेळी त्याने माहिती दिली की, आम्ही पाकिस्तानच्या संघटनेशी संबंधित आहोत, आमचे काम तुमच्या बहिणी, मुली आणि महिलांची इज्जत लुटणे आहे. माझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिल्यास तुझ्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला जाईल.
महिला तहसीलदाराला जाळण्याचा प्रयत्न; सख्ख्या वहिनीनेच रचला कट