श्रीगोंदा : सध्या चोरीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आता श्रीगोंद्यामधून (Srigonda) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बंद घर फोडून चोरटयांनी जवळपास 56 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना घडली आहे.
थरारक घटना, पुराच्या पाण्यात कारसह बाप लेकीवर काळानं घाला घातला
ही घटना श्रीगोंदा शहरातून वेळू रोडकडे जाणाऱ्या वेळू रोडवरील प्रोफेसर कॉलनी (Professor Colony) घडल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, घर बंद आहे. याचा सुगावा चोरट्यांना लागला असावा, व चोरटयांनी घराच्या मागच्या बाजूने घरामध्ये प्रवेश केला आणि ११ हजार रुपयांसह दीड तोळे सोने लंपास केले.
‘या’ पिकाची करा शेती, हमखास मिळेल बंपर उत्पन्न
घरमालक सुदाम सोनाजी धुमाळ (Sudam Sonaji Dhumal) हे घरी परतल्यावर त्यांना हा सर्व प्रकार दिसला. हे समजताच त्यांनी ताबोडतोब पोलिस स्टेशनटकडे धाव घेतली. धुमाळ यांच्या फिर्यादी वरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस यंत्रणा (Police system) करत आहेत.
दुर्दैवी! हेलिकॉप्टर कोसळून 6 जणांचा जागीच मृत्यू; वाचा सविस्तर