Crime News । मागील काही दिवसांपासून टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. शेतकरी टोमॅटोच्या विक्रीतून लाखोंची कमाई (Tomato Price) करत आहे. टोमॅटो महाग झाल्याने सर्वसामान्यांच्या ताटातून टोमॅटो गायब झाला आहे. (Tomato Price Hike) अनेकजण तर टोमॅटोला पर्याय म्हणून केचपचा वापर करत आहेत. परंतु यामुळे गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. (Latest Marathi News)
Crime News । महाराष्ट्र हदरला! अत्याचार करून चिमुकलीची हत्या
आंध्र प्रदेशामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोकराज नावाचा शेतकरी टोमॅटो बाजारात विकून 4.50 लाख रुपये घेऊन घरी निघाला होता. परंतु, यावेळी काही लोकांनी त्याच्यावर अचानक हल्ला करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
दरम्यान, देशातील अनेक भागात टोमॅटोचे दर २०० रुपयांवर गेले आहेत. अशातच आता हे दर ३०० रुपयांपर्यंत जातील, अशी शक्यता सध्या व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. एकेकाळी कवडीमोल भावात विकल्या जाणाऱ्या टोमॅटोला आज चांगले दिवस आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. अनेक शेतकरी टोमॅटो विकून करोडोंचे मालक झाले आहे.
परंतु टोमॅटोचे दर (Tomato Rate) वाढल्यापासून चोरी, लुटमारीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी आपल्या शेतातून टोमॅटोची चोरी होऊ नये म्हणून टोमॅटोची दिवस-रात्र राखण करत आहे.
Goat Disease । सावधान! शेळी आणि मेंढ्यांमध्ये झपाट्याने पसरतोय हा जीवघेणा आजार