
उत्तर प्रदेश: संपूर्ण देशभर नवरात्रउत्सव जल्लोषात साजरा होत आहे. यामध्येच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील भदोहीमध्ये नवरात्रीनिमित्त घालण्यात आलेल्या मंडपाला आग (fire) लागल्याची घटना घडली आहे.यामध्येच ६४ जण होरपळले असून दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जखमी झालेल्या लोकांवर वाराणसी आणि प्रयागराज येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सणासुदीच्या मुहूर्तावर झेंडूची फुले महागणार; किलोचा भाव १००च्या आसपास जाण्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, शार्ट सर्किटमुळे (Short circuit) आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग लागली त्यावेळी मंडपामध्ये जवळपास 150 भाविक उपस्थित होते. ही आगी एवढी भीषण होती की, त्यामध्ये जवळपास 64 भाविक चांगलेच होरपळे आहेत.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! २० ऑक्टोबरपर्यंत मिळणार ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान, वाचा सविस्तर
या आगीमध्ये होरपळलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. यामध्येच बरेच लोक ३० ते ४० टक्के भाजले आहेत तर काहींची प्रकृती फारच गंभीर आहे. या घटनेने तेथील परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी या घटनेवर ट्वीट करत दुःख व्यक्त केलं आहे.
Rahul Gandhi: राहुल गांधींनी शरद पवार स्टाईलने मुसळधार पावसात दिल भाषण, व्हिडीओ व्हायरल