पाण्यात (Water) बुडून मृत्यू झालेल्या घटना आपल्याला वारंवार ऐकायला येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना औरंगाबादच्या (Aurangabad) कन्नड तालुक्यातील नागद सायगव्हाण परिसरात घडली आहे. तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मरण पावलेल्या मुली भिलदरी येथील वीटभट्टीवर आपल्या कुटुंबासह मजुरी करण्यासाठी आल्या होत्या.
मोठी बातमी! कुत्र्याने सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास मालकाला ५०० रुपये दंड
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघी बहिणी सकाळी भिलदरी या ठिकाणातील छोट्या पाझर तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. पण यावेळी त्यांचा पाय घसरून त्या पाण्यात बुडाल्या. दरम्यान, त्यांना त्या ठिकाणी मदतीसाठी कोणीही नसल्याने त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान या घटनेचे माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व त्या दोन बहिणींचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेने मुलींच्या दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. तर आसपासच्या परिसरामध्ये या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
श्री सद्गुरु बजरंग बाबा महाराज स्वरूप सेवा योग विद्या केंद्राचे प्रस्थान आळंदीकडे