Site icon e लोकहित | Marathi News

धक्कादायक! दोन सख्ख्या चिमुरड्या भावंडांचा तळ्यात बुडून मृत्यू

Shocking! Two young siblings drowned in the lake

खोल पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडण्याच्या घटना आजूबाजूला कायम घडत असतात. कोल्हापूर (Kolhapur) येथे नुकतीच अशी घटना घडली आहे. परंतु, यामध्ये दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

येणार …येणार! कापसाला पण ‘अच्छे दिन येणार’; अगामी काळात दर वाढण्याची शक्यता

कोल्हापूरमधील (Kolhapur Accident case) करवीर तालुक्यातील भामटेत तळ्यात बुडून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही दोन्ही लहान मुले एकाच घरातील असल्याने या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ही दोन्ही मुले दुपारच्या सुमारास तळ्यात आंघोळीसाठी गेली असता ही धक्कादायक घटना घडली आहे.

येणार …येणार! कापसाला पण ‘अच्छे दिन येणार’; अगामी काळात दर वाढण्याची शक्यता

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इतकंच नाही तर कोल्हापूरात वेगवेगळ्या ठिकाणी आणखी काही अपघात होऊन 5 जणांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर येथील गणेशनगरमध्ये पोलिसांच्या गाडीखाली येऊन एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे. तसेच शिरोळ तालुक्यातील राधाकृष्ण रोपवाटिककेसमोर जीपच्या धडकेत 50 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला.

आनंदाची बातमी! शेतकऱ्यांनी केवळ चालू वीजबिल भरावी अशी सरकारकडून सूचना

Spread the love
Exit mobile version