धक्कादायक! पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू; वाचा सविस्तर

Shocking! Two youths drowned while going swimming; Read in detail

पालघर : वाडा तालुक्यातील आवंढे मधील वैतरणा नदीत ( Vaitaran River ) बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. पोहण्यासाठी गेलेल्या या तरुणांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील लवकरच दौंड दौऱ्यावर; राहुल कुल यांनी घेतली भेट

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी सुनील बाबू डिगे (वय 30) आणि कार्तिक जाणू कोदे ( वय 17) हे दोघे तरुण वैतरणा नदीत पोहण्यासाठी उतरले होते. यावेळी हे दोन्ही तरुण पाण्यात बुडाले. (Two youngsters drowned) दरम्यान उपस्थितांनी व स्थानिकांनी सर्वप्रथम सुनील डिगे याला पाण्यातून बाहेर काढले.

 विहीरीसाठी अनुदान मिळवणे झाले आणखी सोप्पे! सरकारने ‘ही’ अट रद्द केल्याने शेतकऱ्यांना होणार फायदा

यानंतर लगेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू असतानाच सुनीलचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी काळोख असल्याने कार्तिक कोदे याला शोधण्यात यश आले नाही. मात्र आज सकाळी कार्तिकचा मृतदेह पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोधून काढला आहे.

शरद पवारांवर रुग्णालयात नक्की कोणते उपचार सुरू आहेत? डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं

या घटनेने स्थानिक लोकांना हादरवून टाकले आहे. वाडा तालुक्यात ( Wada Taluka ) मोठी औद्योगिक वसाहत आहे . परंतु, याठिकाणी कुठल्याही नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी साधनसामग्री व बचावपथक नसल्याची तक्रार यावेळी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

राजू शेट्टी शरद पवारांवर भडकले! शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा केला आरोप

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *