
राज्यभरात सध्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. दरम्यान बारावीच्या परीक्षा चालू असतानाच अहमदनगरच्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांची खेडमध्ये 19 मार्चला सभा
घटना घडली अशी की, या विद्यार्थिनीने आणि तीच्या आजोबांनी मागच्या आठवड्यामध्ये परीक्षा देण्याच्या आधी शिळे दोघांनीही अन्न खाल्ले होते. मात्र यानंतर दोघांनाही त्रास सुरु झाला. त्रास सुरु झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले दोघांवरही रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरे-फडणवीस पुन्हा एकत्र येणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथे हा सर्व प्रकार घडलाय. मागच्या बुधवारी हा सर्व प्रकार घडला होता. तेव्हापासून या दोघांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. मात्र यामध्ये विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तीच्या आजोबांचा जीव वाचला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.