अहमदनगरच्या कोपर्डीमध्ये बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, हा चिमुकला पाच वर्षाचा आहे. बोअरवेलमध्ये तब्बल ११ फूट खाली हा चिमुरडा अडकला होता. रात्रीपासून वाचविण्याचे प्रयत्न देखील चालू होते मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाणार; 19 लाख कर्मचाऱ्यांचा असणार सहभाग
कोपर्डीमधील काकासाहेब सुद्रिक यांचा मुलगा बोअरवेलमध्ये हा पडला होता. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामन दलाचे जवान दाखल झाले होते मात्र त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले आहे. मंगळवारी पहाटे त्या चिमुकल्याला बाहेर काढण्यात आले मात्र त्यावेळी त्याचा मृत्यू झाला होता.
ठाकरे गटाला मोठा धक्का; जवळच्या विश्वासू व निष्ठावान कार्यकर्त्याने केला शिंदे गटात प्रवेश!
माहितीनुसार, सागर बुधा बरेला असं या चिमुकल्याचं नाव आहे. या चिमुकल्याला वाचविण्यासाठी एनडीआरएफच्या पाच पथकाकडून बचाव कार्य सुरू होते. मात्र सर्वांचे प्रयत्न आपल्याशी ठरले आहेत.