पालघर : एकमेकांची खोटी सही वापरून फसवणूक केल्याच्या घटना कायम घडत असतात. अशीच एक घटना पालघरमध्ये (Palghar) घडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बनावट सही असलेल्या सरकारी (Govt) व्यवहाराच्या पेमेंट स्लिप दाखवून पालघरमध्ये एका व्यक्तीची १.३१ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.
यंदाच्या वर्षी गाळप हंगाम सुरु होण्याआधीच ऊसतोड मजूर कारखान्यावर दाखल, उपासमारीची आली वेळ
स्टेशनरी दुकानाचे मालक जिग्नेश गोपानी यांची फसवणूक केल्याप्रकरणी वसई तालुक्यातील नालासोपारा या ठिकाणचा रहिवासी जतीन पवार आणि शुभम वर्मा यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानाचे मालक जिग्नेश गोपानी यांना आरोपींनी सांगितले की, त्यांना राज्य सरकारचे ई-पोर्टल फ्रँचायझी उघडायचे आहे. सोबत एक लाख रुपये मागितले. पण यांनी पैसे देण्यास नकार दिला. मात्र त्यानंतर आरोपींनी अनेकवेळा पैसे मागितले असे पैसे मागत मागत दोन्ही आरोपींनी गोपानी यांच्याकडून एकूण १,३१,७५,१०४ रुपये घेतले.
यंदाच्या वर्षी गाळप हंगाम सुरु होण्याआधीच ऊसतोड मजूर कारखान्यावर दाखल, उपासमारीची आली वेळ
माहितीनुसार, आरोपींनी गोपानी यांना ई-पोर्टल फ्रँचायझीसाठी परवाना, परमिट आणि त्याचबरोबर इतर फी भरण्याची स्लिप दिली होती. त्या स्लिपवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे नाव आणि इंग्रजीत सही होती. स्लिपवर मुख्यमंत्र्यांची सही पाहून संशय आल्याने गोपानी यांनी पोलिसांशी संपर्क साधला. आता यांनतर पोलिसांनी या प्रकरणावर तपास सुरु केला आहे.
Abdu Rojik: काय सांगता! अब्दु रोजिक आहे ‘एवढ्या’ संपत्तीचा मालक; वाचा सविस्तर