
सध्या पुण्यामधून (Pune) कुस्तीक्षेत्रातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुस्तीचा सराव करत असताना एका पैलवानाला हार्ट अटॅक (Heart attack) आल्याने त्या पैलवानाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने सगळीकडे शोककळा पसरली आहे. स्वप्नील पाडाळे असं या मृत्यू झालेल्या पैलवानाचं नाव आहे.
शरद पवारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा; म्हणाले, “माझ्या जन्माच्या तिसऱ्या दिवशी…”
पैलवानाच्या मृत्यूने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. घटना घडली अशी की, आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पैलवान स्वप्नील पाडाळे (Swapnil Padale) तालिमीत कुस्तीचा सराव करत असतानाच त्याला हार्ट अटॅक आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
माहितीनुसार, हा तरुण मागच्या काही दिवसांपासून मारुंजीच्या मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात कुस्तीचा सराव करण्याबरोबर नवख्या तरुणांना कुस्तीचे धडे देखील शिकवत होता. स्वप्नील महाराष्ट्र चॅम्पियन राहिलेला असल्यामुळं त्याला अनेक कुस्तीगीर वस्ताद मानत होते. त्यामुळे त्याच्या अचानक जाण्याने सगळीकडे शोककळा पसरली आहे.