
नैसर्गिक संकटांप्रमाणेच पिकांना मिळणारा बाजारभाव देखील शेतकऱ्यांना वेळोवेळी हतबल करत असतो. मागील काही दिवसांपासून कापसाचे दर पडले होते. मात्र मागील आठवड्यात दरामध्ये वाढ झालेली दिसून आली. अशातच सध्या पुन्हा एकदा कापसाच्या ( cotton) दरात घसरण झाली आहे. यामुळे हतबल होऊन तरुण शेतकऱ्याने आत्महत्या ( farmer’s sucide) केल्याची घटना मगाराष्ट्रात घडली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एकतुनी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघातावर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
विलास दादाराव गोरे ( Vilas Gore) या 27 वर्षीय तरुणाने एकतुनी येथे आत्महत्या केली आहे. कापसाच्या किंमतीत झालेली घसरण पाहून तणावात येऊन या शेतकऱ्याने आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. विलास गोरे यांनी कापूस या पिकातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल या आशेतून दोन एकर क्षेत्रावर कापूस लावला होता. यासाठी लागणाऱ्या मशागत व रासायनिक खतासाठी गोरे यांनी सावकारी कर्ज घेतले होते.
महत्वाची बातमी! कृषी ड्रोनसाठी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणार लाखोंचे अनुदान
मात्र डिसेंबर आला तरी कापसाला दर नाही. या निराशेतून विलास गोरे यांनी आत्महत्या केली आहे. बुधवरी (दि.21) सायंकाळी स्वतःच्या शेतात असणाऱ्या विहरित उडी मारून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अजूनही विलास गोरे यांचे लग्न झाले न्हवते. एवढ्या कमी वयात आत्महत्या केल्याने एकतुनी परिसरात विलास गोरे यांच्यासाठी हळहळ व्यक्त केली जात आहे.