Gadar 2 । बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर 2’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अभिनेत्री अमिषा पटेल (Amisha Patel) यांची जोडी या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र पाहायला मिळाली आहे. फाळणीच्या 24 वर्षांनंतरची या सिनेमाची कथा आहे. यामध्ये पाकिस्तानच्या लष्करसोबतची लढाई देखील दाखवण्यात आली आहे. (Latest Marathi News)
Chandrayaan 3। चंद्राजवळ पोहोचूनही ‘चांद्रयान 3’ला 23 तारखेपूर्वी लँडिंग शक्य नाही, कारण…
या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड केले आहे. अजूनही सिनेमाच्या कमाईचा (Gadar 2 Collection) आलेख वाढतच चालला आहे. अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ने देशात 543.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशातच आता गदर 2 आपली कमाल दाखवू शकतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु पाकिस्तानी अधिकाऱ्याची भूमिका साकारलेला अभिनेता रुमी खान (Rumi Khan) अडचणीत आला आहे.
बंपर ऑफर! स्वस्तात खरेदी करा iPhone 12, ‘या’ ठिकाणी मिळत आहे संधी
कारण त्याने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना आवडली नाही. मध्य प्रदेशमधील एका थिएटरमध्ये हा अभिनेता हा सिनेमा पाहायला गेला असता तिथे प्रेक्षकांनी त्याला घेराव घातला. तेथून त्याने कसाबसा पळ काढत तो कारमध्ये बसला. परंतु प्रेक्षकांनी त्याच्या कारच्या विंडशील्डला मारायला सुरुवात केली. या घटनेमुळे हा अभिनेता प्रचंड घाबरला होता. त्यावर त्याने प्रतिक्रियाही दिली.
” तो प्रसंग खूप भीतीदायक होता. मी फक्त चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. परंतु त्यांना ते खरंच वाटलं. मी फक्त अभिनय केला आहे हे देखील त्यांना समजत नाही. यापूर्वी मी अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. परंतु पहिल्यांदा हा अनुभव मला आला,” असे रुमी खान म्हणाला.
पुणे लोकसभा जागा वाटपावरून ठाकरे-पवारांमध्ये मतभेद, ठाकरे गटाने केली ‘ही’ मागणी