दोन हजार रुपयांची गुलाबी नोट हातात आली की, कुठल्याही सामान्य माणसाला ती सुट्टी करण्यासाठी होणारी तारांबळ सहन करावी लागते. परंतु, तुम्हाला माहित आहे का? मागच्या काही दिवसांत या नोटांचाच तुटवडा भासत आहे.
पतंजलीला मोठा झटका; या ५ औषधांवर आली बंदी
आर्थिक वर्ष 2019-20, आर्थिक वर्ष 2020-21 आणि आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 2000 रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नाही. असा अहवाल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ( Reserve Bank Of India) प्रसिद्ध केला आहे.
इंस्टाग्राम रिल्स मधूम ‘असे’ कमवा पैसे! मेटा कडून नवीन प्रोग्राम जाहीर
2016 च्या नोटाबंदी नंतर 500 व 2000 च्या नव्या नोटा चलनात आल्या. यावेळी बंद झालेल्या 500 व 1000 च्या नोटांची कमी ही 2000 ची नोट भरून काढेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. परंतु 2000 च्या नोटांमुळे चलनातील उर्वरित नोटांची गरज कमी झाली.
बिग ब्रेकिंग! “तुझ्यात जीव रंगला” फेम अभिनेत्री कल्याणीचा अपघाती मृत्यू
यावेळी 2017 च्या मार्च पर्यंत चलनात असणाऱ्या नोटांच्या तुलनेत 2000 च्या नोटांचा वाटा 50.2 टक्के होता. नंतर 2000 रुपयांच्या नोटेमुळे उर्वरित नोटांची गरज कमी होऊ नये, म्हणून एप्रिल 2019 पासून रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही. याचाच परिणाम म्हणून लोकांच्या हातात दोन हजाराच्या नोटा कमी दिसत आहेत.