Crime News । अहमदनगर : राज्यात सध्या उसाची तोडणी सुरु आहे. दूरच्या ठिकाणाहून ऊसतोड मजूर (Sugarcane workers) आपल्या मुलाबाळांसमवेत ऊस तोडणीसाठी आले आहेत. पण एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पारनेरमध्ये मागील दोन आठवड्यापूर्वी गोळीबाराची घटना घडली होती. अशातच आता पुन्हा एकदा अहमदनगर (Ahmednagar) गोळीबाराच्या घटनेने हादरले आहे. (Ahmednagar Crime News)
Maharashtra politics । उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का! बड्या नेत्याची आज होणार एसीबी चौकशी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड वर्षांपुर्वी जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून चक्क ऊसतोड मजुराने जामखेड तालुक्यातील पाटोदा येथे मुकादमावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या गोळीबारात मुकादमाच्या पायाला गोळी आहे.
Section 144 In Pune । पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरात लागू केले १४४ कलम, नेमकं प्रकरण काय?
घटनेनंतर त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठविले होते. या प्रकरणी बाबुलाल पठाण यांनी फिर्याद दिली असून गोळीबार करणारे दोन आरोपी फरार आहेत. त्यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न आणि आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि जामखेड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.