Ajit Pawar । राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पद नको तर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी विषयी जबाबदारी देण्याची मागणी केली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावर मत व्यक्त केले आहे. (Latest Marathi News)
आता छत्री घेऊनच घराबाहेर पडा, पावसाबाबत हवामान विभागाने दिली मोठी अपडेट; राज्यात कसं असेल हवामान?
सध्या एकनाथ शिंदे सातारा (Satara) दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बोलताना ते म्हणाले की, ‘राज्यात सरकार आणि विरोधी पक्ष आवश्यक असतात. अजित पवार यांचे काम चांगले आहे. आमचे संबंध चांगले असून आम्ही सभागृहात एकमेकांना चांगले बोलतो. त्यांनी विरोधी पक्षनेते पदावर राहायचे की नाही हा त्यांचा अंतर्गत विषय आहे.’
पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना! पत्नीच्या जेवणात ड्रग्स मिसळून दुसऱ्या पुरुषांना…
दरम्यान, पाऊस पडत नसून सरकार याकडे लक्ष देत नाही, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. त्याला आता शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विरोधी पक्षाचे काम टीका करण्याचे आहे, परंतु त्यांनी चांगल्याला चांगले म्हणावे. राज्यात कोठेही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मी आवाहन करत आहे. विरोधी पक्ष असाच आरोप करत राहील. जनतेला माहिती आहे कोण काम करते आणि कोण काम करत नाही, असा चिमटा एकनाथ शिंदे यांनी काढला आहे.
प्रवाशांनी गच्च भरलेल्या बसचा टायर फुटला अन् झाला भीषण अपघात; १२ जण जखमी