नाद करा पण आमचा कुठं! शेतकऱ्याने दूध आणि शेणातून बांधला एक कोटीचा बंगला

Shout but where are we? A farmer built a bungalow worth one crore from milk and dung

जिद्दीला कष्टाची जोड असेल तर माणूस काहीही करू शकतो. आपल्या आजूबाजूला भरपूर माणसांनी याच गोष्टींच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण केलेले असते. सांगोला तालुक्यातील ( Sangola Taluka) इमडेवाडी येथील एका शेतकऱ्याने देखील अशीच कमाल केली आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण हा शेतकरी फक्त दूध व्यवसायातून ( Dairy Farming) वर्षाला तब्बल दीड कोटी रुपयांचे उत्पन्न घेतो. इतकेच नाही तर या व्यवसायातून मोठा नफा कमावून या शेतकऱ्याने एक कोटी रुपयांचा बंगला बांधला आहे.

थेट जर्मनीहून कांदे लावण्यासाठी महिला आली भारतात; पाहा VIDEO

प्रकाश इमडे असे या प्रगतशील शेतकऱ्याचे नाव आहे. प्रकाश यांनी स्वतःचा दूध व्यवसाय उभा केला आहे. यासाठी त्यांनी तब्बल चार एकर जमीन गुंतवली असून दोन एकरांत गुरांचा गोठा बांधला आहे. तर उर्वरित दोन एकरांत जनावरांसाठी हिरवा चारा तयार केला आहे. 1998 साली एका गाई पासून सुरू झालेला हा व्यवसाय आता 150 गायींपर्यंत आला आहे. सध्या प्रकाश इमडे हे रोज 1000 लिटर दुध डेअरीला देतात. यातून त्यांना मोठे उत्पन्न मिळते. याशिवाय शेणातून देखील इमडेंना वर्षाला 12 लाखांच्या आसपास उत्पन्न प्राप्त होते.

शिंदे सरकारनं ऊस उत्पादकांना दिली मोठी खुशखबर

इमडेंना आजूबाजूच्या परिसरातील लोक ‘प्रकाशबापू’ म्हणून ओळखतात. विविध भागांतील लोक प्रकाशबापूंचा गोठा पाहण्यासाठी आवर्जून येतात. कारण, त्यांचा हा व्यवसाय अगदी नियोजनबद्ध पद्धतीने चालतो. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान ( Modern technology) देखील वापरण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती या गोठ्यात काम करते. त्यांच्यासोबतीला चार मजूर सुद्धा असतात.

शाहरूखच्या चित्रपटाचे चक्क औरंगाबादमध्ये होणार शूटिंग; बिडकीन मधील ‘डीएमआयसी’त चाहत्यांची गर्दी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *