Site icon e लोकहित | Marathi News

नाद करा पण आमचा कुठं! शेतकरी घालतोय हार्ले डेव्हिडसनवर दूध

Shout but where are we? Farmer pouring milk on Harley Davidson

आपल्या आजूबाजूला अनेक दूध विक्रेते ( MilkMan) असतात. हे दूध विक्रेते साहसा सायकल किंवा सध्या गाडीवरून दूध विकायला येतात. अधिक पैसे मिळवण्यासाठीची त्यांची धडपड व कष्ट आपण नेहमी पाहत असतो.

ब्रेकिंग! राज ठाकरेंचा अयोधा दौरा रद्द करण्यामागे भाजपचा हात; ‘या’ मनसे नेत्याचा दावा

दरम्यान सोशल मीडियावर (Milkman on Social Media) एका दुधवाल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण हा दूधवाला चक्क लाखोंच्या गाडीवरून दूध विकतोय. इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसवर हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

धक्कादायक! ऑनलाईन गेम खेळताना तरुणाची ३२ लाखांची फसवणूक

या व्हिडिओमध्ये एक दूधवाला घराच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडताना दिसत आहे. तो ज्या बाईकवर बसून बाहेर येतोय, त्या बाईकचे नाव ‘हार्ले डेव्हीडसन’ असून त्या बाईकची किंमत सुमारे 6 लाख इतकी आहे.

‘या’ गावातील लोक कपडे न घालताच राहतात; 85 वर्षांपासून आहे परंपरा!

ज्या लोकांना हा दूधवाला दूध विकतो, त्या सर्वसामान्य लोकांच स्वप्न असणारी ही बाईक या दूधवाल्याकडे आहे. याचे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. अमित भदाना यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून, या व्हिडिओला सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

‘केजीएफ’चा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; रॉकी भाईच्या बड्डेला चाहत्यांना मोठं गिफ्ट!

Spread the love
Exit mobile version