
लावणी म्हंटल की आजकाल लोकांना फक्त गौतमी पाटील आठवते. कारण, मागील काही दिवसांपासून राज्यात गौतमी पाटील हे नाव प्रचंड चर्चेत आहे. महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटीलला कोणी ओळखत नाही असं शोधूनही सापडणार नाही. तिच्या हटके डान्समुळे ती सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. मुलांच्या वाढदिवसानिमित्त किंवा इतर काही कार्यक्रमानिमित्त गौतमीला आमंत्रित केले जाते.
होळी खेळण्याचा फायदा घेत तरुणांनी परदेशी तरुणीशी केले अश्लील वर्तन; पाहा VIDEO
दरम्यान आता गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन मुलाच्या वाढदिवसाला नाही तर बैलाच्या वाढदिवसाला होत आहे. सातारा जिल्ह्यातील खर्शी (ता.जावली) येथील बैलगाडा मालक पैलवान सतीश भोसले यांनी महाराष्ट्र चॅम्पियन अश्विन या बैलाच्या वाढदिवसाला चक्क गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामुळे याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
मोठी बातमी! OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचे निधन
माहितीनुसार, सतीश भोसले यांचे शर्यतीच्या बैलावर खूप प्रेम आहे. ते दरवर्षी बैलाचा वाढदिवस साजरा करतात. यावर्षी देखील बैलाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने त्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन केले आहे. त्यांनी चक्क गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
धक्कादायक घटना! इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात बुडाले 55 हजार रुपये!