
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सगळे लोक आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडीओत ट्रॅक्टर नसल्याने महिंद्रच्या थारला थेट नांगराला जोडण्यात आल्याचे आपल्याला दिसत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत व्यक्तीने थारला रोटोवेटरशी जोडले आहे. यामुळे याची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे.
बिबट्याची दहशद! थेट घरात घुसला अन्…”, पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ
महिंद्रा थार ही एकदम महागडी गाडी आहे. आणि या गाडीने शेत नांगरण्यात येत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेत असून या व्हिडीओला मागच्यावर्षी डिसेंबरला arunpanwarx या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आले आहे. या व्हिडीओला 40 हजारपेक्षा जास्त लाईक्स झाल्या आहेत. तर 2 लाख 60 हजार व्यूज मिळाले आहेत.
“भाजपाला गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यावर कमेंट करत एका युजरने लिहिले की, ‘महेंद्रा ज़ी नों प्रोंलम’ तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘सुप्रीम पॉवर ही एक नवीनता आहे’ त्याचबरोबर काही युजर हसण्याचे ईमोजी देखील कमेंट करत आहेत. अशा अनेक वेगेवेगळ्या कमेंट नेटकरी या व्हिडिओवर करत आहेत.
मोठी बातमी! नाशिक जिल्ह्यात रात्री अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान